हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव मधील इच्छादेवी चौक परिसरामध्ये हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची माहिती अशी कि, जळगाव शहरातील पंचशील नगर इच्छादेवी मंदिराजवळ परिसरात एक जण बेकायदेशीर रित्या हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी संशयित आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक सुधीर साळवे यांच्यासह इतरांनी कारवाई करत संशयित आरोपी रितेश उर्फ तिच्या कृष्णा शिंदे (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याबाबत पोलीस नाईक सुधीर साळवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.