Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»दावोस परीषदेसाठी खासदार उन्मेष पाटील यांची निवड
    ताज्या बातम्या

    दावोस परीषदेसाठी खासदार उन्मेष पाटील यांची निवड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 15, 2023Updated:January 15, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क
    जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परीषदेसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे अभ्यासू युवा खासदार उन्मेश पाटील यांची निवड करण्यात आली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी
    यंदा परीषद 15 जानेवारीपासून पाच दिवस सुरू राहणार आहे. या परीषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावणार असून ते 17 जानेवारीला संध्याकाळी चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान संबोधन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त या परीषदेला जगभरातील इतर नेतेही उपस्थिती लावणार आहेत. या वर्षीच्या परीषदेचा विषय हा ‘जागतिक परिस्थिती’ असा आहे.

    दावोस हे स्वित्झर्लंडमधील लँड वासर नदीच्या काठावर वसलेलं सुंदर खेडं आहे. हे गाव स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरागांनी वेढलेलं आहे. या गावाची लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे ठिकाण आहे. दावोसमध्ये दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीसाठी जगभरातील बडे नेते आणि उद्योगपती आपली उपस्थिती लावतात. दरवर्षी या बैठकीत जवळपास अडीच हजार व्यक्ती सहभाग घेतात.

    राज्यातून या खासदारांची झाली निवड

    वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जीनेव्हामध्ये आहे. या संस्थेच्या माध्यमातून जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात आणि जागतिक विकासाला चालना देण्यासंबंधी धोरण निश्चित करतात. पाच दिवस चालणार्‍या या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील बड्या व्यक्ती सहभाग घेतात. उच्च शिक्षित, अभ्यासू, युवा खासदार उन्मेश पाटील यांची महाराष्ट्रातून निवड झाली आहे. त्यांच्यासोबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व खासदार हेमंत पाटील हे देखील या परीषदेसाठी सहभागी होणार आहे. उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव खासदार उन्मेशदादा पाटील हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत सहभागी होणार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Davos MP Unmesh Patil वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif