लोकशाही न्यूज नेटवर्क
औरंगाबाद शहर पोलीस विभागातील सहाय्य्क पोलीस आयुक्तांनी एका महिलेची दारूच्या नशेत छेड काढल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विशाल ढुमे असे सहाय्य्क पोलीस आयुक्तांचे नाव आहे .
एसीपी विशाल ढुमे हे रात्री एका हॉटेलात दारू पिण्यासाठी गेले असता त्यांच्या ओळखीचा एक मित्रही आपल्या पत्नीसोबत तिथे आल्या या दोघांची भेट झाली.
यावेळी विशाल ढुमे यांनी आपल्याकडे कार नसल्याने मला लिफ्ट मिळेल का? अशी मित्राकडे केली.मित्राने देखील यासाठी होकार दिला आणि त्यांना आपल्या कारमध्ये बसवले. कारमध्ये बसल्यावर मागच्या सीटवर बसलेल्या ढुमे यांनी दारूच्या नशेत वाहनात महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. महिलेच्या पाठीवरून हात फिरविला. . त्यानंतर पुढे आल्यावर मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला, अशी मित्राला विनंती केली. त्यानुसार घरी पोहचल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे असे सांगत वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. पण तिथेही महिलेची छेडछाड केली. याप्रकरणी संबंधित महिला व तिच्या पतीने छेडछाड आणि मारहाण प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरोधात फिर्याद दिली आहे.दरम्यान यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.