अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
गस्तीवर असताना एकाला वाहन बाजूला लाव असे सांगितल्याने याचा राग येऊन अज्ञात व्यक्तीने पोलिसाला डोक्यावर आणि हातावर बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना पहूर बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री सडे नऊ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुरवाडे असे जखमी पोलीस कॉन्स्टेबल यांचे नाव आहे.

सध्या फत्तेपूर आऊट पोस्ट येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे हे १४ रोजी शनिवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास पहूर बस स्थानक परिसरात एका व्यक्तीस रस्त्याच्या बाजूला वाहन लाव असे सांगितले. यावर अज्ञात व्यक्तीने  पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांना बेदम मारहाण केली. यात अनिल सुरवाडे गंभीर जखमी झाले. त्यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करण्यासाठी आणण्यात आले त्यांच्यावर डॉक्टर अमोल पाटील यांनी प्रथमोपचार करून त्यांना जळगाव येथील मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्या डोक्यात मार लागला असून एक हात फॅक्चर झाला आहे तसेच त्यांच्या सोबत असलेले वाहन चालक रवींद्र मोरे यांनाही त्या व्यक्तीने धमकी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.