क्रिकेट विश्वातून वाईट बातमी, ‘या’ खेळाडूचे कर्करोगाच्या आजाराने निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आशिया कपचा महासंग्राम सुरु असतांना क्रिकेट विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४९ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधी हिथ स्ट्रीक यांच्या निधनाची अफवा समोर अली होती. त्यावेळी त्यांच्या घरच्यांकडून हिथ स्ट्रीक यांच्या मृत्यू झाल्याच्या बातमीला अफवा असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले हिते. आता हीथ स्ट्रीक यांच्या पत्नी आणि वडिलांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून हीथ स्ट्रीक हे कर्करोगाच्या आजारासोबतच झुंज देत होते. रविवारी रात्री एकच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीथ स्ट्रीक यांच्या निधनाच्या बातमीने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. हीथ स्ट्रीक यांच्या पत्नीने तांबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.

हीथ स्ट्रीक यांनी ६५ कसोटी ससोटी आणि १८९ वन डे सामने खेळले असून, कसोटीमध्ये १९९० तर ३ हजार धाव केल्या आहेत. त्यासोबतच कसोटीमध्ये २१६ आणि वन डे मध्ये २३९ विकेट्स घेतल्या आहेत. हिथ हे झिम्बाब्वेकडून कसोटी आणि वन डे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.