Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»शाहरुख आला विषय संपला, ‘जवान’ चित्रपटाने मोडले रेकॉर्ड !
    मनोरंजन

    शाहरुख आला विषय संपला, ‘जवान’ चित्रपटाने मोडले रेकॉर्ड !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 3, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ज्या ठिकाणी शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) विषय येतो तिथे सर्व विषय संपलेले असतात. शाहरुखचा चित्रपट जेव्हा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असतो, तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद कमालीचा सकारात्मक असतो. हे अनेकदा सर्वांना दिसून आले आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी जवान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा येणारा चित्रपट सर्वच जण बघण्यास उत्सुक असतात. त्यामुळे किंग खानच्या चित्रपटांचे अॅडव्हान्स बूकींगही जोरात होते. आता सर्वत्र चर्चा जवानची सुरु आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बूकींगला अगदी खूप जास्त प्रतिसाद मिळत असून, अनेक रेकॉर्ड हा चित्रपट मोडू शकतो.

    मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या जवान या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगने मोठा पल्ला गाठला आहे. जवान चित्रपटाने पठाण (Pathan) चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अधिकृतपणे जवानची अॅडव्हान्स बूकींग सुरु झाली असून अनेक थिएटर्समध्ये जवानचे शो आत्तापासूनच हाऊसफुल्ल झाले आहेत.

    जवानचा ट्रेलर आल्यानंतर त्याच्या अॅडव्हान्स बूकींगला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. सोबतच मेकर्सनं शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून जवानची अॅडव्हान्स बूकींग सुरु होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर किंग खानच्या जवानच्या अॅडव्हान्स बूकींगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. २४ तासात जवाननं केवळ तीन मोठ्या नॅशनल सिनेमा चेन्समधून १ लाख ६५ हजार तिकीटांची अॅडव्हान्समध्ये विक्री केली आहे. यापूर्वी शाहरुखच्या पठाणला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच १ लाख १७ हजार तिकीटांची अॅडव्हान्स बूकींग केली होती. यावरून असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही की, शाहरुखचा जलवा मोठ्या पडद्यावर कायम आहे.

    #jawan Pathan Shah Rukh Khan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘गजिनी’ फेम प्रदीप रावत काळाच्या पडद्याआड

    August 5, 2026

    हेच मतदार आहेत. मग त्यांना का ट्रोल करता?

    July 30, 2026

    लक्षात ठेवा, विमानतळावर तुम्हाला कानाखाली मारली होती!

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif