निवडणुकांच्या प्रचारासाठी चक्क ‘कंडोम’च्या पाकिटांचा वापर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष काय करतील याचा भरवसा नाही. निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांकडून पैसे, दारू, आणि साड्यांचे वाटप सऱ्हासपणे केले जाते. पण, हे प्रकरण इथेच थांबलेले नाही, दारू आणि साडीपाठोपाठ आता कंडोमचाही निवडणूक घोषणांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

हा पराक्रम आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आला आहे, जिथे राज्यातील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी कंडोमच्या पॅकेटवर निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव छापून ते घरोघरी वाटल्याचा आरोप आहे. यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

घरोघरी केले कंडोमचे वाटप
व्हायरल व्हिडिओमध्ये, कामगार सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष टीडीपी या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह असलेली कंडोमची पाकिटे वाटताना दिसत आहे. मतदारांना घरोघरी जाऊन ही पाकिटे दिली जात आहे. यासंबधीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.