गुलमर्गमध्ये बर्फाचा डोंगर कोसळला, ३ जण जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जम्मू आणि काश्मिरच्या गुलमर्गमध्ये बर्फाचा डोंगर कोसळला असून यामध्ये ३ परदेशी नागरिक अडकले होते. यांपैकी एकाच मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर लष्कराच्या तुकडीकडून काम सुरु आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजेच्या सुमारास गुलमर्ग इथे भूस्सखलनाची घटना घडली. गुलमर्ग हे पर्यटन स्थळ असून, सध्या इथे बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हंगाम आहे. दरम्यान, या भूस्खलनात तीन परदेशी पर्यटक अडकून पडले होते. याची खबर मिळताच लष्कराच्या बचाव पथकाकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली.

दरम्यान, या अडकलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. तर एकाचा अद्याप पत्ता लागलेला नाही, त्याचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे, अशी माहिती बारामुल्लाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं याची माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.