मोठी घोषणा.. गणेशोत्सवात शेवटचे 5 दिवस स्पीकर 12 पर्यंत !

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज गणपती मंडळांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. यावर्षी गणेशोत्सव  (Ganesh Utsav) धुमधडाक्यात साजरा करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे.

विशेष म्हणजे गणेशोत्सवातील शेवेटचे पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरला (speaker) परवानी असेल. धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करु, असं मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलं आहे. त्यामुळे गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह संचारला आहे.

“पुण्याच्या गणपती मंडळाला ऐतिहासिक वारसा आहे. अनेकजण गणेशोत्सव पाहायला येत असतात. काही मागण्या होत्या. त्याबाबत चर्चा करण्यासाठी मंडळांसोबत बैठक पार पडली. गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे सण-उत्सव साजरा करता आला नव्हता. पण आता सगळे नियम पाळून उत्सव साजरा करायचा आहे. मंडप शुल्क माफ केलाय. परवानगीसाठी चकरा माराव्या लागणार नाहीत. गणपती उत्सव मंडळांना अडचण येणार नाही. जिल्हाधिकारी सगळं पाहतील. मिरवणुका नियम पाळून करू, कुठल्याही अडचणी येणार नाही हे पाहू. कोर्टाचे नियम पाळू”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.