जळगावातील नवीपेठेत ज्वेलर्स दुकान फोडले ; तिजोरी तोडण्याचा प्रयत्न (पहा व्हिडीओ )

0

चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ; श्वान पथकही घुटमळले ! ; बॅँक परिसर झालाय असुरक्षित

जळगाव ;- शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग समजल्या जाणाऱ्या नवीपेठ भागात आज लक्ष्मी गोल्डन हाऊस या ज्वेलर्स दुकानाचे लाकडी दरवाजाला अडकवलेली लोखंडी पट्टीचे हुक तोडून दुकानातील तिजोरी तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली . गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नवीपेठ भागातील वीज गेली होती. या अंधाराचा फायदा घेऊन चोरटयांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असून एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आज १ डिसेंबरच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमाराला चोरटे आले असून १ वाजून ५३ मिनिटाला तो बाजूच्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

या चोरट्याने दुकानातील सीसीटीव्हीच्या वायरी कापून टाकल्याचे आणि बाजूच्या इंडिया फर्निशिंग दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेरा वाकविल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांसह श्वान पथकाने भेट दिली असता श्वानाने टॉवर पर्यंत रस्ता दाखविला. दरम्यान या परिसरात युको बँक,सारस्वत बँक ,डीएनएस बँक सारख्या नामांकित बँका असतानाही या ठिकाणी असुरक्षित असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे . घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकाने पाहणी केले. तसेच यावेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

नवीपेठेत हेमंत रुंगठा, त्रिलोक रुंगठा यांचे १९५८ पासून असलेले जुने लक्ष्मी गोल्डन हाऊस नावाने दुकान असून या दुकानात दागिने घडविण्याचे काम केले जाते. गुरुवारी नेहमी प्रमाणे हेमंत रुंगठा रात्री साडे दहा वाजे पर्यंत उपस्थित होता. त्याने दुकान बंद केल्यानंतर १ वाजून ५३ मिनिटाला एक चोरटा हा दुकानात आला . त्याने दुकानाची पट्टी तोडून आत प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र तिजोरी या चोरट्याकडून न खुलल्याने त्याने चांदीचे काही तुकडे घेऊन सीसीटीव्हीच्या वायरी कापून पलायन केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.दरम्यान या घटने बाबत उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेशिवाय इतर नामांकित खासगी बँका असल्याने आणि या गल्लीत नामांकित प्रतिष्ठाने असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी अपेक्षा येथील रहिवाशी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.