अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान, बळीराजाने उचलले टोकाचे पाऊल

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पावसामुळे पिकांचे अतिशय नुकसान झाल्याने व शेतात केलेल्या कूपनलिकेला चांगले पाणी नसल्याने निराश झालेले शेतकरी हेमराज भटेसिंग गिरासे (वय ४७) यांनी तोतयाचे पाऊल उचलले.

पथारे (ता,शिंदखेडा) येथील शेतकरी हेमराज भटेसिंग गिरासे यांनी गुरुवारी (दि. ३०) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास निमगूळ रस्त्यावरील खळ्यात विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. याची माहिती त्यांचे लहान भाऊ विरपाल गिरासे (खर्दे ता.शिंदखेडा) यांना मिळाली. त्यांनी नेतेवाइकांसह ग्रामस्थांच्या खासगी वाहनातून दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात भटेसिंग गिरासे यांना दाखल केले. डॉ. तेजस जैन यांनी तपासून दुपारी साडेबाराला मृत घोषित केले.

हेमराज गिरासे यांनी शेतीसाठी विविध बँकांतून कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली असल्याची फिर्याद विरपाल गिरासे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई गावित तपास करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.