विवाह समारंभातून नवरीचे दागिने लांबवले ; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरात एका विवाह समारंभात फोटो काढत असतांना दागिने आणि रोकड असलेली बॅग एका अल्पवयीन मुलाने अलगद लांबविल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यात सुमारे साडेतीन लाखांचे दागिने आणि रोकड असल्याने याबाबत शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज विक्रम कोळी (वय-51) रा. एसबीआय कॉलनी, महाबळ यांच्या मुलीचे लग्न गुरुवारी एका हॉटेलात झाले. सायंकाळी 7 वाजता लग्न सोहळ्यात रिसेप्शन व फोटोसेशन कार्यक्रम सुरू असताना वधूचे दागिने आणि रोकड असलेली पिशवी ही मनोज कोळी यांच्या पत्नीकडे होती. लग्नसोहळ्यात फोटो सेशन सुरू असतांना पैसे व दागिन्यांची पिशवी ही वधूवर यांच्या सोप्यावर पिशवी ठेवली होती. पाहूण्यांशी बोलतांना व्यस्त असतांना एक अल्पवयीन मुलाने सोप्यावरील पिशवी चोरून नेली. पुढे गेल्यावर त्याच्या सोबत एक तरूण देखील होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. पैसे व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वत्र शोध घेतला परंतू कोणीच आढळून आले नाही.

हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज पाहिले केले असता यात अल्पवयीन मुलगा याने सोप्यावरील दागिन्यांची पिशवी सोबत असलेल्या तरूणासोबत पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर मनोज कोळी यांनी शुक्रवारी 27 जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.