अमळनेर बस स्थानकात पैसे चोरताना एका महिलेस पकडले

0

अमळनेर ;- येथील बसस्थानकात एका प्रवाशाच्या खिशात हात घालून पैसे काढत असताना एका चोरट्या महिलेस रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्यासह चौघांवर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमराव सोनू बिहाडे (रा. प्रियदर्शनी नगर, नगाव बारी, धुळे) हे ११ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अमळनेरहून दोधवद (हिंगोणे) येथे जाण्यासाठी बस मध्ये चढत होते. एका संशयीत महिलेने त्यांच्या खिश्यात हात घालून सहाशे रुपये काढत असताना बिऱ्हाडे यांनी हात पकडला. मात्र महिलेने हात झटकून पळ काढला. त्यावेळी बसस्थानकावरील लोकांनी तिला पकडले.

पोलीस चौकीतील महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे, अशोक कुमावत, निलेश मोरे यांनी तिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली. तिने तिचे नाव संगीताबाई विष्णू लोंढे, (वय ४५, रा. इंदिरानगर, चाळीसगाव) असे सांगितले. बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून संगीताबाईसह अज्ञात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.