पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाखाली ‘द बर्निंग’ रिक्षाचा थरार

0

रिक्षा चालकाच्या सतर्कतेने दुर्दैवी घटना टळली ; रिक्षा जळून खाक

जळगाव :- धावत्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याने व ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने रिक्षा सतर्कतेने सतर्कतेने रस्त्याच्या बाजूला थांबवून थांबवून प्रवाशांना तातडीने खाली उतरवून बाजूला होताच रिक्षाने पेट घेऊन संपूर्ण रिक्षा खाक झाल्याची घटना आज गुरुवार 12 रोजी दुपारी  अडीच वाजेच्या सुमारास पिंपराळा उड्डाणपुलाच्या खाली घडली. यानंतर मनपाच्या अग्निशमन दलाने रिक्षाला लागलेली आग विझवली.

जळगाव शहरातील पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळून गेलेल्या रस्त्यावर गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगावातून पिंप्राळा येथे जात असलेल्या रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ३४८८) ही प्रवाशी घेवून जात होती. त्यावेळी अचानक रिक्षाने पेट घेतला. ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा रोडच्या बाजूला घेवून रिक्षा थांबविली. त्यानंतर क्षणातच रिक्षाने मोठा पेट घेतला.

यात संपुर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली यांची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान काही वेळानंतर महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथकातील युसुफ पटेल, भारत बारी, रविंद्र बोरसे आणि तेजस जोशी यांनी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविली. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.