जळगावात घरफोडी ; हजारोंचा ऐवज लंपास

0

जळगाव :-बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घरातून दोन लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार सात ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन वाजे दरम्यान घडला याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की महेश विनायक वाणी वय ते 30 हे नोकरी करीत असून ते स्वामी रेसिडेन्सी पारिजात कॉलनी महाबळ येथे राहतात. सात ऑगस्ट 2023 रोजी सकाळी साडेअकरा ते तीन वाजे दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी साठ हजार रुपये किमतीची मंगल पोत, पंधरा हजार किमतीचे सोन्याचे कानातले, नऊ हजार किमतीची अंगठी, साडेचार हजार रुपये किमतीची अंगठी, 15 हजारांची गळ्यातली चैन ,चांदीची कुयरी ,चांदीच्या साखळ्या, 30000 ची सोन्याची अंगठी, 9000 किमतीचे सोन्याचे अंगठी, घड्याळ दहा हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. करणे वाणी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.