Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात वृद्धेची सोनसाखळी केली लंपास
    गुन्हे वार्ता

    जळगावात वृद्धेची सोनसाखळी केली लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील नूतन मराठा महाविद्यालय परिसरात रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेला दोघांनी गाठून भविष्य सांगण्याच्या नावाखाली तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे असे सांगून बोलण्यात गुंतवून ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कानळदा येथील कमलाबाई रामचंद्र सोनवणे या येथे राहतात . जळगावातील त्यांच्या नातीला बाळंतपणासाठी शाहूनगरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कमलबाई या नातीकरीता जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या होत्या. डबा देवून दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास त्या पायी घराकडे जाण्यासाठी निघाल्या असतानाच नूतन मराठा कॉलेजच्या समोर युनिक अकॅडमी समोरील रोडने आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना थांबवले. तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. मी तुमचे भविष्य सांगतो, असे म्हणून रस्त्याच्या बाजूला बसवले. बोलण्यात गुंतऊन कमलबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत काढून घेत कागदाच्या पुडीत ठेवून भामट्यांनी कागदाची पुडीची अदला-बदली केली. त्यानंतर दुनियादारी चांगली नाही तुझ्या गळ्यातील पोत कागदावर ठेव आणि घरी गेल्यावरच उघड, असे त्यांनी वृद्धेला सांगितले.

    वृद्धेने गळ्यातील पोत काढून कागदावर ठेवत शाहूनगर परीसरातील हॉस्पिटलमध्ये गेली. यानंतर वृद्ध महिलेने हातातील पुडी आपल्या नातीकडे दिली. तिने पुडी उघडून बघितली असता त्यात सोन्याची पोत दिसून आली नाही. आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दिल्याने दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सिकंदर तडवी पुढील तपास करीत आहेत.

    #crime Crime jalgaon Crime Jalgaon Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif