केवायसी पूर्तता , भागभांडवल जमा न केल्यास सभासदत्व होणार रद्द

0

डोंबविलीच्या चिवा सहकारी पतसंस्थेत सर्वानुमते ठरावाला मंजुरी

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क

पतसंस्थेच्या सभासदानी केवायसी पूर्तता आणि भागभांडवल किमान २ हजार रुपये ३० जून २०२३ पर्यंत जमा न केल्यास सभासदत्व हे सूचना न देता रद्द करण्यात येईल. असा ठराव नुकताच १९ फेब्रुवारी रोजी डोंबविलीच्या चिवा सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

चिवा सहकारी पतसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा दि 19.फेब्रुवारी .2023 रोजी रविवार संध्याकाळी नित्यानंद बँक्वेट हॉल जयहिंद कॉलनी डोंबिवली (प.) येथे राजेंद्र पंडित वाणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये झालेल्या महत्वाच्या विषयांमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.

यामध्ये मागील तीन वर्षांच्या सततच्या केलेल्या सूचनेनुसार व सभासदांना केलेल्या विनंतीनुसार सर्व सभासदानी आपले भागभांडवल किमान २ हजार रूपये टप्प्याटप्प्याने कमाल 30.जून .2023 पर्यंत करणे आवश्यक आहे. तरी सर्व सभासदानी आपले भागभांडवल किमान २ हजार रूपये करावे. व ज्यांचे भागभांडवल ३० जून २०२३ पर्यंत सूचना करून देखील २ हजार होत नाही अशा सभासदाचे सभासदत्त्व रद्द करून त्यांना त्यांचे असलेले भागभांडवल परत करावे. तसेच ज्या सभासदांनी आपली केवायसी (ग्राहकास जाणून घेणे) पूर्ण केलेली नाही त्यानी आपला संपर्क मेल वा भ्रमणध्वनी क्रमांक, फोटो, सेल्फ अटेस्टेड पॅन कार्ड झेरॉक्स व सेल्फ ॲटेस्टेड आधार कार्ड झेरॉक्स देवून ती त्वरीत पूर्ण करावी , अन्यथा अशा सभासदाचे सभासदत्त्व सूचना न देता रद्द करण्यात येईल. असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी संस्थेचा संपर्क भ्रमणध्वनी 9987750888 (संस्थेच्या कार्यालयीन वेळेत करावा. सोमवार वगळून रोज सकाळी 10 ते 12)या वेळेत संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक संपर्क : उपाध्यक्ष मो.9879606002 सचिव मो.9867900902 कोषाध्यक्ष मो.9223538001 व्यवस्थापक मो.9987750888

Leave A Reply

Your email address will not be published.