खडसे महाविद्यालयातील प्राध्यापकांचा जुनी पेन्शन मागणी संपाला पाठिंबा

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्य सरकारी- निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्याकडून जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे.या संपाला मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी संपात या संपला प्रत्यक्षपणे सहभागी न होता या संपाला काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज सुरू ठेवत पाठिंबा दर्शविला आहे. या जुनी पेन्शन मागणी संदर्भात महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्राचार्यांना निवेदन दिले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांना निवेदन देऊन सर्व कर्मचारी या संपास पाठिंबा देत आहेत. सदर कर्मचारी खालील प्रमाणे डॉ. सी. जे. पाटील, डॉ.आर. डी.येवले, डॉ. इस्माईल शेख,डॉ.विजयकुमार डांगे, प्रा. यू.एन. इंगळे, प्रा. एस. व्ही. राणे, डॉ. कृष्णा गायकवाड, डॉ. दीपक बावस्कर, डॉ. अतुल वाकोडे, डॉ.अतुल बढे,डॉ. ताहिरा मीर, प्रा. वंदना चौधरी, प्रा. अमोल ढाके, डॉ.संतोष थोरात,डॉ. सोमेश्वर भले, डॉ. बालाजी तोटावर, डॉ. सुरेखा चाटे, डॉ.रंजना झीजोरे, प्रा. लतेश भंगाळे, विजय जंगले, सागर चौधरी इत्यादी कर्मचारी या जुनी पेन्शन मागणी संदर्भात हजर होती.

Leave A Reply

Your email address will not be published.