खुशखबर; ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षांच्या भेटीला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या 2014 साली प्रदर्शित झालेला ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या चित्रपटातील कलाकार, गाणी आणि संवाद सर्व काही प्रेक्षकांना प्रचंड आवडलं, हा चित्रपट एकदा नाहीतर अनेकदा लोकांनी पाहिला.

आता या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा पार्ट दोन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी ही घोषणा केली आहे. या चित्रपटाचा पार्ट २ येणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सचिन पिळगावकर यांनी 2004 मध्ये ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. चित्रपटाचे नाव ‘नवरा माझा नवसाचा 2’ अस असणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला उद्यापासून म्हणजेच 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील सचिन पिळगावकर हेच करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.