गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद आणि शनिवारी सर्वात गंभीर रूप घेतले. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शेतकऱ्यांनी दाखल केला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

का दाखल केला ॲट्रॉसिटीचा गुन्हा ?
आमदार गणपत गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता जातीवाचक शिवीगाळ केली. असा आरोपी शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यासह जितेंद्र पालिक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान चंद्रकांत ओल, नागेश बारगेट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.