बालविवाह पडला महागात,११ जणांवर गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी बालविवाह करणे तरुणासह त्याच्या नातेवाईकांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर अल्पवयीन मुलीचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील लोंजे, सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे वास्तव्याला असलेला गोकुळ कैलास पवार या तरुणाशी झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी चौकशी केली. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पती गोकुळ कैलास पवार, अरुण फुलसिंग पवार, चुलत दीर सज्जन रतन पवार, सासरे कैलास फुलसिंग पवार, चुलत दीर ज्ञानेश्वर बाबुलाल पवार, दीर धनराज कैलास पवार, चुलत दीर रवींद्र युवराज पवार (सर्व रा.लोंजे ता. चाळीसगाव) भाऊसाहेब रामलाल सोनवणे, आई विमलबाई भाऊसाहेब सोनवणे, अण्णा अभिमन मालिक, आजी कलाबाई अण्णा मलिक (सर्व रा. झोडगे, ता.मालेगाव जि.नाशिक) यांच्याविरोधात बालविवाह कायद्याप्रमाणे चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.