छत्तीसगडमधे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन अधिकारी शहिद

0

छत्तीसगढ, लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्तीसगढ (Chhattisgarh) मध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर येत आहे. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ही चकमक झाली आहे.दरम्यान, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या या चकमकीत तीन डीआरजी पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. यामध्ये एएसआय रामुराम नाग, सहाय्यक हवालदार कुंजम जोगा आणि हवालदार वंजाम भीमा अशी शहीद झालेल्या पोलीस अधिकांऱ्यांचा समावेश आहे.

सर्व पोलीस गस्तीसाठी जात होते. त्यावेळी सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. यात तीन डीआरजी अधिकारी शहीद झाले असून, दोन जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.