नवाझुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत वाढ, पत्नी आलियाचे गंभीर आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरु होते. पत्नी आलिया सिद्दीकी ने नवाजुद्दीन वर गंभीर आरोप केले होते. आता पुन्हा नाझुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली असून या दोघांचा वाद कमी होण्याऐवजी अजून विकोपाला पोहचला आहे. नुकताच आलियाने नवाझुद्दीन सिद्दीकी याच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली. पतीवर बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर आलियाने मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. सध्या आलिया आणि नवाझुद्दीन सिद्दीकी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आलियाच्या आरोपांनंतर नवाझुद्दीन सिद्दीकीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

एका मुलाखतीत आलिया हिला विचारलं, नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्यासोबत असलेल्या संबंधांना बलात्कार असं का म्हणते? यावर आलिया म्हणाली, ‘आम्ही कधीही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये नव्हतो. आम्ही पती – पत्नी होतो. आम्ही तीन महिले रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही एकदा आमच्या नात्याला संधी दिली. पण नवाझुद्दीन सिद्दीक याला वाटलं की मुलांसाठी आपल्याला पुन्हा एकत्र यायला हवं.

Leave A Reply

Your email address will not be published.