पिंपळगाव येथील 34 क्विंटल कापूस चोरट्यांनी केला लंपास

0

पिंपळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंपळगाव पोलिस स्टेशन गु. र.न. 31/2023 भा द वि 461, 380 या गुन्ह्यात शिंदाड गावातील शेतकऱ्यांचा 34 क्विंटल कापूस चोरट्यांनी गोडाऊन मधून चोरून नेला होता सदर सदरबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात शिंदाड एकूण 9 आरोपी यांना दि 17/02/2023 रोजी अटक करून पोलिस कस्टडी रिमांड मा. प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने त्यांची पोलिस कस्टडी रिमांड न देता mcr केला होता सदर केसमध्ये jmfc कोर्टाच्या आदेश विरोधात दि.19/02/2023 रोजी मा.श्री. बी.एस. वावरे मा. जिल्हा न्यायाधीश -3, व अतिरिक्त सत्र न्यायाधिश सत्र न्यायालय जळगाव यांच्या न्यायालयात फौजदारी पुनर्विलोकन अर्ज क्र.21/2023 अन्वये रिविजन दाखल करण्यात आले होते आज दि. 24/2/2023 रोजी सदर केसची सुनावणी होऊन मा. सत्र न्यायालयाने सदर आरोपी यांची 4 दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. सदर केसमध्ये सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनीलकुमार राजकुमार चोरडिया यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.