मानाच्या पुरस्कार सोहळ्यात RRR चित्रपटाचा डंका

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

RRR या चित्रपटाची जादू कायम आहे. ह्या चितपटाचे अनेक पुरस्कार सोहळ्यात आपली छाप सोडल्यानंतर, अजून एक अभिमानास्पद बाबा घडली आहे. नुकतीच हॉलिवूड क्रिटिक असोसिएशन अवॉर्ड्स २०२३ (HCA Film Awards) ची घोषणा झाली. हा पुरस्कार सोहळा जगातला मानाचा पुरस्कार सोहळा मानला जातो. RRR ला सर्वोत्कृष्ट आंतराराष्ट्रीय सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

याशिवाय बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणून RRR ने पुरस्कार पटकावला आहे. RRR चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. याशिवाय RRR नाटू नाटू गाण्यासाठी बेस्ट सॉंग आणि बेस्टस्टंट असा पुरस्कार मिळाला आहे. RRR ह्या चित्रपटामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे नाव उंच झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.