जिल्ह्यात रासायनिक खतांचा साठा मुबलक

0

जळगाव, (विवेक कुलकर्णी) लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) पुरवठा कमी होत असून खतांची उपलब्धता कमी असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्हा परिषदमध्ये पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली.

संभाजी ठाकूर म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या रासायनिक खते कमी पडणार नाही. जिल्ह्यात सध्यात १ लाख मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

तसेच कृषी विभागातर्फे शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात आले आहे. जिल्ह्यात रासायनिक खताच्या टंचाई नाही, सर्व खते जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच शेतकरी बांधवांनी विशिष्ट एकाच खताची मागणी करू नये. उपलब्ध असलेल्या सरळ खताची युरिया यशस्वी पोटॅश वापर करून घरच्या घरी मिश्र खाते तयार करून त्याचा वापर करावा.

खत साठ्यासंदर्भात उपलब्धतेचे बाबत किंवा जादा दराने विक्री बाबत काही तक्रार असल्यास तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा.

पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.