जुळ्या बहिणींसोबत लग्नगाठ, तरुणाला पडले महागात

0

अकलूज, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या लग्न सराई सुरु आहे. त्यातच अकलूजमधल्या (Akluj Viral Wedding) एक लग्न सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ (Viral Marriage) घालत आहे.

एक तरूणाने दोन मुलींशी एकाच मांडवात रेशीमगाठ बांधली आहे. अतुल अवताडे या तरूणाने रिंकी आणि पिंकी पाडगावकर (Rinki Padgoankar Pinki Padgoankar and Atul Awtade) या दोन जुळ्या बहिणींसोबत सप्तपदी घेतली. त्यांच्या या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

तक्रार दाखल

अतुल अवताडे आणि रिंकी-पिंकी पाडगावकर यांनी वऱ्हाडींच्या उपस्थितीमध्ये सप्तपदी घेतल्या. वैवाहिक सुखाचे स्वप्न रंगवत असतांना त्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. कारण या लग्नानंतर अतुलच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल झाला आहे.

कारवाईला सुरुवात

अतुल अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर 2 मध्ये राहणाऱ्या तरुणाने 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी पाडगावकर आणि पिंकी पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला.पण त्यांचा हा आनंद दोन दिवसही टिकला नाही. अतुल विरोधात तक्रार करण्यात आली आहे. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबतची तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणी आहेत. त्यामुळे त्या एकमेकींसोबत लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. दोघींनी एकत्रच इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्या दोघी कायम एकमेकींसोबत असतात. इथून पुढेही त्यांना एकमेकींसोबत राहायची इच्छा आहे. त्यामुळे त्या दोघींनीही एकाच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांआधी त्यांची अतुलसोबत ओळख झाली. त्यानेही या लग्नाला होकार दिला. अन् 2 डिसेंबरला या तिघांचा विवाह सोहळा पार पडला.

अतुल रिंकी आणि पिंकी यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. त्यांच्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.