1 सप्टेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उद्यापासून सप्टेंबर (September) महिन्याला सुरूवात होत असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून गोष्टी आणि नियमांमध्ये बदल होणार आहे.

बँकिंग नियम, एलपीजीच्या (LPG) किमतींमध्ये बदल, शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित कामांचा निपटारा, असे अनेक बदल आहेत, जे 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत (LPG prices) बदल करतात. अशा परिस्थितीत एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा एलपीजी सिलिंडर आजच बुक केल्यास तुम्हाला नवीन दरातून पैसे द्यावे लागणार नाहीत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) मिळविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. शेतकऱ्यांनी हे काम 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण न केल्यास त्यांचा पुढील हप्ता अडकू शकतो.

त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) मार्गदर्शक तत्त्वांनुसार बहुतांश बँकांनी केवायसी अपडेट करण्यासाठीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 ही निश्चित केली आहे. जर तुमचं खाते 31 मार्च 2022 पर्यंत KYC अपडेट केलं नसेल तर ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करा. केवायसी अपडेट करण्यासाठी, तुमच्या मूळ शाखेशी संपर्क साधूनच KYC अपडेटची पुढील प्रक्रिया करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.