वेश्याव्यवसायासाठी अल्पवयीन मुलीची विक्री

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वेश्याव्यवसाय करण्यासाठी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री तसेच बळजबरी विवाह लावून देण्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादीने विरोध केल्याने तिला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड जिल्हा परभणी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख संशयीत आरोपी महिलेने पिडीत अल्पवयीन मुलीला तिच्या दिर व दिराणी तसेच दिराचा शालक अशा तिघांना वेश्याव्यवसायासाठी विक्री केल्याचं फिर्यादित म्हटलं आहे.

दरम्यान यातील संशयीत आरोपी असलेल्या महिलेच्या दिराच्या शालकासोबत बळजबरी बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिडितेने फिर्यादीत केला आहे. हा सर्व प्रकार २३ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.