Wednesday, February 1, 2023

ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, वाचा यादी

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. ऐन सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने  २४ रेल्वे गाड्या रद्द केल्याने प्रवासी नाराज झाले आहेत.  रेल्वेने हा निर्णय घेतल्याने मात्र अगोदरच आरक्षण करून ठेवलेल्या प्रवाशांना फटका बसला आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे नागपूर मार्गावरील २४ गाड्या ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या सात दिवस रद्द केल्या आहेत.

- Advertisement -

गणेशोत्सवामुळे बाहेरगावला असलेले परिवार गावी जात असतात, त्यामुळे अनेक प्रवाशांनी गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र आता ते आरक्षण गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे तिकीटे रद्द झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय हाोत आहे. विकास कामांसाठीच ब्लॉक घेतला असून, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन भुसावळ विभागाचे सिनीयर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी केले आहे.

या रेल्वे गाड्या रद्द

शालिमार-एलटीटी शालीमार एक्सप्रेस (१८०३०-१८०२९) ४ सप्टेबर पर्यंत रद्द, हावडा-मुंबई सीएसएमटी मेल (१२८१०-१२८०९) हावडा अमदाबाद हावडा एक्स्प्रेस (१२८३४-१२८३३), हावडा पुणे हावडा आझाद हिंद (१२१३०-१२१२९), एलटीटी शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ही गाडी २ व ३ सप्टेबर रद्द, शालीमार एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्पेस (१२१०२) १, ४ व ५ सप्टेंबरला रद्द, हातिया पुणे २ सप्टेबर, पुणे हातिया एक्स्प्रेस ४ सप्टेबर, हाटिया – एलटीटी एक्स्प्रेस २ व ३ सप्टेबरला रद्द, एलटीटी हटिया एक्स्प्रेस ४ व ५ सप्टेबरला रद्द, पारबंदर – शालीमार एक्प्रेस ३१ ऑगस्ट व १ सप्टेबरला रद्द, शालीमार पोरबंदर एक्स्प्रेस २ व ३ सप्टेबरला रद्द, संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस ३ सप्टेबर, पुणे- संत्रागाची हमसफर एक्सप्रेस ५ सप्टेबरला रद्द , हावडा – साईनगर शिर्डी एक्सप्रेस १ सप्टेबरला रद्द, साईनगर शिर्डी – हावडा एक्सप्रेस ३ सप्टेबरला रद्द, ओखा-शालिमार एक्सप्रेस ४ सप्टेबर, शालीमार – ओखा एक्सप्रेस ६ सप्टेबरला रद्द, टाटानगर -इतवारी एक्सप्रेस ४ सप्टेबर व इतवारी – टाटानगर एक्सप्रेस ६ सप्टेबरपर्यत रद्द केली आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे