चांद्रयान- ३ च्या काऊंडाऊन मधील महत्वपूर्ण आवाज हरपला

शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं वयाच्या ६४ व्या वर्षी निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताचं चांद्रयान- ३ मध्ये महत्वाची भूमिका साकारणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ एन. वलारमथी (Scientist N. Valaramathi) यांचं वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झालं. शनिवारी संध्याकाळी चेन्नईमध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. इस्रोच्या चांद्रयान ३ मिशन लाँचच्या काऊंडाऊन मागील आवाज हा त्यांच्याच होता. १४ जुलै रोजी प्रक्षेपित केलेल चांद्रयान-३ हे त्यांच्यासाठी शेवटचं काउंटडाउन ठरलं.

केंद्रीय मंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनीही दुःख व्यक्त करत शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इस्रोच्या मोहिमांच्या लाँचिंगचं काऊंटडाऊन मागील आवाज हरपला. एन. वलारमथी यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटल्याचं राजीव चंद्रशेखर म्हणाले. त्यांच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

30 जुलैला केलं शेवटचं काऊंटडाऊन
बहुप्रतीक्षित इस्रोच्या प्रक्षेपणपूर्व काऊंटडाऊनच्या घोषणांमागील एन. वलरामथी या आवाज होत्या आणि चांद्रयान मोहिमेशिवाय 30 जुलै रोजी रॉकेट लाँचिंगवेळी त्यांनी शेवटची घोषणा केली, ज्यात एका समर्पित व्यावसायिक मोहिमेचा भाग म्हणून PSLV-C56 रॉकेटने 7 सिंगापूर उपग्रहांचं लाँचिंग केलं. एन. वलारमथी या गेल्या सहा वर्षांपासून सर्व लाँचसाठी काऊंटडाऊन घोषणा करत होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.