धक्कादायक.. एअर होस्टेसची गळा चिरून हत्या

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत एअर होस्टेसची गळा चिरून हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.  मुंबईच्या पवई भागातील मरोळ येथील अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून रुपल ओगरे असे मृत एअर होस्टेसचे नाव आहे. ती मूळची छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील होती. सध्या ती मुंबईच्या पवाई भाघातील मरोळ स्थित एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती.

रुपल ओगरे हिच्यासोबत तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्सही राहत होते. कुणीतरी तिची अत्यंत निर्घृणपणे गळा चिरून हत्या केली. यासंबंधीच्या माहितीनुसार, हत्या झाली त्या दिवशी रुपल घरात एकटीच होती. तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्स गावी गेल्यामुळे तिच्यासोबत घरी कुणीच नव्हते. तिच्या कुटुंबीयांनी तिला अनेकदा कॉल केला. पण ती त्यांच्या फोनला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे काळजीपोटी त्यांनी तिच्या एका मैत्रिणीला फोन करून तिची माहिती काढण्यास सांगितले. त्यानंतर तिची मैत्रीण तिच्या घरी पोहोचली. तिने बराच वेळ दार ठोठावून पाहिल्यानंतरही तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिच्या पायाखालची वाळूच सरकली. रुपलचा मृतदेह गळा चिरल्याच्या स्थितीत फ्लॅटमध्ये पडलेला होता.

दरम्यान  या प्रकरणाची माहिती तत्काळ पवई पोलिस व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.