‘मराठवाड्यात’ एसटीने प्रवास करत असाल, तर एकदा वाचाच

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यात हिंसक वळण लागल्यानं याचा फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही बसलाय. लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वत्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमुळे एसटीच सुमारे १० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातच आज राज्यभरात बंदची हाक देण्यात आली आहे. तसंच एसटीने सर्व विभाग नियंत्रकांना पोलीस यंत्रणेच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन मगच डेपोतून एसटी काढावी, अशाही सूचना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आल्या आहे. जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, पंढरपूर, अहमदनगर, नंदुरबार, आणि नाशिक या जिल्ह्यातील ४६ आगारातील वाहतूक बंद ठेवल्याने महामंडळाला आठ ते दहा कोटींचे नुकसान झाले आहे.

पुण्यातून मराठवाड्यात बस नाही
जालन्यातील घटनेनंतर सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातून सोलापूर, जालना, धुळे, नगर, संभाजीनगर, लातूर, अवसा या गावात जाणारी एकही बस सुटलेली नाही. या मार्गावर दररोज सहाशे साडेसहाशे बसेस धावतात. रोज तेरा ते पंधरा हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करत असतात. मात्र कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये आणि जाळपोळ होऊ नये, याची काळजी घेत या बस पुण्यातच थंबवण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं बघायला मिळत आहे.

कोल्हापुरातून सातारा-पुणे-मुंबई साठी जाणाऱ्या एसटी बंद
कोल्हापुरातून सातारा-पुणे-मुंबई साठी जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहे. सातारा जिल्यातच आंदोलन होत असल्याने शहरातील वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. मराठा समाजाच्या उद्रेकानंतर ठिकठिकाणी याचे पडसाद उमटले असून आंदोलन करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.