महागाईचे सावट ! डाळींचे भाव कडाडले

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महागाईमुळे जनता हैराण झाली आहे त्यात अजून भर पडली आहे. डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न सुरु केले आहे. निर्यात बंदी, आयात शुल्क अशा उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत.  या दोन महिन्यांपासून डाळीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यांपासून सणांचा हंगाम सुरु होत आहे.

ग्राहक विभागाने दिलेल्या आकड्यानुसार, 1 ऑगस्ट रोजी दिल्लीत हरबरा डाळीचा भाव 72 रुपये होता. 1 सप्टेंबर रोजी ही डाळ 82 रुपये प्रति किलोवर पोहचली. तर दिल्लीत तूरडाळीचा भाव 148 रुपये किलोहून 162 रुपये किलोवर पहोचली. या दरम्यान उडदाच्या डाळीचा भाव 5 रुपयांनी वाढून 132 रुपयांवर पोहचला. मसूर डाळ भाव 4 रुपये प्रति किलोने वाढून 91 रुपये झाली. डाळींचा भाव 14 टक्क्यांनी वाढला.

महागाईने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेकॉर्ड ब्रेक केला. 30 ते 40 रुपये किलो टोमॅटोचा भाव थेट 300 ते 350 रुपये किलोवर पोहचला. किरकोळ महागाईचा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला. हा दर 7.44 टक्क्यांवर गेला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.