चाळीसगाव शिक्षण संस्थेत आ. मंगेश चव्हाणांचे पॅनल पिछाडीवर

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून १९ जागांपैकी ५ जागांचे निकाल जाहीर झाले आहे. त्या पाचही जागा य. ना. चव्हाण स्मृति पॅनल अर्थात खासदार उन्मेष पाटील यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून आमदार मंगेश चव्हाण यांचे विकास पॅनल पिछाडीवर आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ही कधी नव्हे एवढी राजकीय आखाड्याने गाजली. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे प्रा. अरुण निकम यांचे विकास पॅनल , संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय य. ना. चव्हाण यांचे सुपुत्र डॉक्टर विनायकराव चव्हाण व खासदार उन्मेश पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांचे स्मृती पॅनल व माजी नगरसेवक प्रशांत देशमुख यांचे परिवर्तन पॅनल असे या निवडणुकीत उतरले होते. परंतु या अटीतटीच्या निवडणुकीत मतदार राजाने स्वर्गीय य. ना. चव्हाण यांचे सुपुत्र डॉक्टर विनायक चव्हाण यांच्या स्मृती पॅनलला पसंती दिल्याने स्मृती पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

त्यांच्या पॅनलच्या महिला गटामध्ये अनुक्रमे १) बोरसे अलका भीमराव २) भोसले पुष्पा सदाशिव ह्या विजयी झाल्या आहेत तर स्मृती पॅनलचे अनुसूचित जाती जमातीचे मधील उमेदवार माजी मंत्री स्वर्गीय दादासाहेब डीडी चव्हाण यांचे सुपुत्र महेश दिनकरराव चव्हाण हे विजयी झालेले आहेत. तसेच ओबीसी गटातून स्मृति पॅनलचे उमेदवार भाऊसाहेब महारु पाटील हे विजयी झालेले आहेत. भटक्या विभक्त्या जाती गटातू स्मृति पॅनलचे राजपूत सोनू सिंग प्रताप सिंग हे विजय झालेले आहेत.

उर्वरित सर्वसाधारण गटातील १४ जागांपैकी अकरा जागांवर स्मृती पॅनलचे उमेदवार लीडवर असून तर विकास पॅनलचे तीन उमेदवार लीडवर आहेत. आतापर्यंत झालेल्या मतदानापैकी चार फेरी झाली असून अजून पाच फेरी बाकी आहेत.

५५० मत मोजणी अखेर मिळालेली मते
अहिरराव प्रदीप १५४
धनंजय चव्हाण २८५
दिलीप रामराव १९०
बाळासाहेब चव्हाण २७६
भास्कर चव्हाण १५१
लक्ष्मण चव्हाण १६७
अविनाश देशमुख २३४
किशोर देशमुख १९५
प्रशांत देशमुख ९२
सुनील देशमुख २२६
विनायक चव्हाण ३२७
नरेश देशमुख ७०
संजय देशमुख २२६
किसनराव जोरवेकर २६
एकनाथ खलाणे ५५
अरुण निकम २१५
तात्यासाहेब निकम १९७
विकास पाखले १९४
आनंदराव पाटील २०३
भैय्यासाहेब पाटील २८७
गोविंदराव पाटील ६७
हंसराज पाटील २०५
प्रमोद पाटील ३०४
रोहिदास पाटील ८३
साहेबराव पाटील २२५
शेनपडू पाटील २०४
सुधीर पाटील १८५
विकास पाटील २२४
भगतसिंग पवार २६
भीमराव पवार ५३
पंडित पवार ३६
रावसाहेब साळुंके १९२
शशिकांत साळुंखे १८४
सुरेश स्वार १९२
बारीकराव वाघ २०४
धर्मराज वाघ १९७
शरद मोरांकर १९१

Leave A Reply

Your email address will not be published.