Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे राजकिय पक्षांच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांचा सन्मान
    जळगाव जिल्हा

    भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे राजकिय पक्षांच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांचा सन्मान

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्र पत्रकार संचलित भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील विविध राजकिय पक्षातील तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बादल यांच्या अध्यक्षतेखालील मुख्य उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता आकडे, लक्ष्मण भाऊ मंगलकार्याचे संचालक विजय महाजन, तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे, राज्य उपाध्यक्ष पत्रकार सुनील पाटील, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर महाजन यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांताधिकारी डॉ. विक्रम बादल यांच्या हस्ते विविध राजकीय पक्ष असलेले तालुका अध्यक्ष यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पत्रकार संघाच्या पाल्यांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बादल यांच्यासह, तहसिलदार मुकेश हिवाळे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी विचार मांडून मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सागर महाजन यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार राकेश पाटील व पत्रकार रमेश धनगर यांनी केले. आभारप्रदर्शन पत्रकार राकेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राज्य उपाध्यक्ष सुनील पाटील, कार्यकारिणी सदस्य सोमनाथ पाटील, जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटील, तालुका अध्यक्ष सागर महाजन, पत्रकार सुनील कासार, पत्रकार नितीन महाजन, पत्रकार संजय पवार, पत्रकार एस. डी खेडकर आण्णा पत्रकार अशोक परदेशी, पत्रकार राकेश पाटील, पत्रकार नरेंद्र पाटील यांच्यासह पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

    #bhadgaon भडगाव तालुका पत्रकार संघ
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif