Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»अक्षय केळकर ठरला बिगबॉस मराठी ४ चा विजेता
    मनोरंजन

    अक्षय केळकर ठरला बिगबॉस मराठी ४ चा विजेता

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 9, 2023Updated:January 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    बिग बॉस मराठी सिजन ४ (Bigg Boss Marathi Season 4)चा ग्रँड फिनाले नुकताच धुमधडाक्यात पार पडला असून, अक्षय केळकरने (Akshay Kelkar) हा सिजन आपल्या नावे केला आहे. त्याला बक्षीस म्हणून १५ लाख ५५ हजार रुपये मिळाले. असून स्पॉन्सर्सकडून सोन्याची चैन आणि बेस्ट कॅप्टन ठरल्यामुळे पाच लाख रुपये मिळाले, अंतिम फेरीत त्याची सहस्पर्धक अपूर्व नेमळेकर(Apoorva Nemalekar) ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर अक्षयने बिगबॉस सीजन ४ जिंकला आहे.

    स्पर्धेत अभिनेते किरण माने हे सुद्धा अंतिम फेरीत तिसऱ्या क्रमांकावर होते. टॉप 5 स्पर्धकांमध्ये अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अमृता धोंगडे आणि राखी सावंत यांचा समावेश होता. त्यापैकी अमृताला घराबाहेर पडावं लागलं आणि राखीने 9 लाख रुपये स्वीकारून घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये स्पर्धक 100 दिवस घरातील कॅमेऱ्यांच्या नजर कैदेत होते.
    बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच तो तगडा स्पर्धक मानला जात होता. तीन महिन्यांपूर्वी तो बिग बॉसच्या घरात सर्वांत लोकप्रिय स्पर्धक म्हणून सहभागी झाला. घरातील स्पर्धकांसोबतच्या भांडणांमुळे आणि त्याच्या वक्तव्यांमुळे तो कायम चर्चेत राहिला. अक्षय या शोचा ‘अँग्री यंग मॅन’ (“Angry Young Man”) म्हणूनही ओळखला जातो. विशेष म्हणजे या संपूर्ण सिझनमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी अक्षयचीच सर्वाधिक शाळा घेतली होती. घरातील इतर स्पर्धकांसोबत हाणामारी केल्यामुळे तो चर्चेत असायचा. खेळाडूवृत्ती, प्रत्येक टास्कमधील मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला.

    "Angry Young Man" Akshay Kelkar Apoorva Nemalekar Bigg Boss Marathi Bigg Boss Marathi 4 Winner Bigg Boss Marathi Season 4 Mahesh Manjrekar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif