इ.पी.एस 95 राष्ट्रीय संघर्ष पाचोरा- भडगाव समितीची बैठक संपन्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

इ.पी.एस 95 राष्ट्रीय संघर्ष पाचोरा- भडगाव समितीची बैठक पाचोरा येथे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा समन्वयक अनिल पवार भडगाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. अध्यक्ष पाचोरा भडगाव इंजि. नंदलाल बोदडे यांनी प्रास्ताविक करून दि. 04-11-2022 चा सुप्रीम कोर्टाचा निकाल व EPFO ने 29।12।2022 रोजी अन्यायकारक काढलेले परिपत्रक व आपल्या संघटनेची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. दि. 10-1-2023 रोजी EPFO जळगाव येथील कार्यलायासमोर सदर परिपत्रकाची होळी करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त संख्येने हजर राहून सहभागी होऊ असे जाहीर आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल पवार यांनी कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष विरेंद्रसिंह राजवत, राष्ट्रीय सरचिटणीस पी. एन. पाटील, राष्ट्रीय मुख्य सल्लागार विलासराव पाटील, राष्ट्रीय मुख्य समनव्यक शोभा आरस व सरिता नारखेडे हे EPS 95 पेन्शनर्सना 7500 पेन्शन+महागाई भत्ता व मेडिकल सुविधा मिळाव्यात म्हणून अहोरात्र मेहनत करीत असल्याचे सांगितले, त्यासाठी आपणसुद्धा प्रत्येक संघर्षासाठी सिध्द रहा व नेतृत्व देईल त्या आदेशाचे पूर्ण ताकदीने झोकून द्यावे तरच आपली शक्ती सरकार पर्यंत पोहचेल व खात्रीपूर्वक सांगितले की, कमांडर अशोक राऊत व केंद्रीय नेतृत्व आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देतील असा विश्वास दिला त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने EPFO जळगाव येथील कार्यालयासमोर 10 जानेवारी रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. आम्ही महिलांचा स्वतंत्र EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती स्थापन करतो. आपले व नंदलाल बोदडे साहेबांचे मार्गदर्शन मिळावे अशी विनंती केली त्याला लगेच मान्यता दिली.

नवीन वर्षात सर्वांनी 120 रुपये देऊन सभासद व्हावे अशी विनंती केली असता उपस्थित सभासदानी होकार दिला व अजून राहिलेले सभासद वाढवू असे सांगितले. असेच संघटित रहा आपण विजयाच्या जवळ आहोत निराश होऊ नका आपले हक्क आपण नक्कीच मिळवून यशस्वी होऊ असे सांगितले. काही कागदावरील संघटना दिशाभूल करून पैसे मागत आहेत त्यांना बळी पडून फसवणूक करून घेऊ नये. असे सावध करत फक्त आपल्या संघटनेवर विश्वास ठेवा असे सांगून अनिल तात्या पवार यांनी आपले मनोगत पूर्ण केले. बैठकीला झोपे, सचिव गवानदे आण्णा, भिकन मनोरे, हरिष आदिवाल, समदानी, दोन महिला सदस्य व उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.