सासूचा हात पकडून विनयभंग; जावयावर गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोला माझ्यासोबत आत्ताच पाठवा नाहीतर तुम्ही चला असे अपशब्द वापरून जावयाने सासूचा विनयभंग केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर येथील तरूणाची सासुरवाडी चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील आहे. कौटुंबिक वाद असल्याने पत्नी ही माहेरी निघून गेली आहे. पत्नीला घेण्यासाठी पती हा सासुरवाडीला २४ सप्टेंबर रोजी गेला. पती घेण्यासाठी आला परंतू पत्नीने सोबत जाण्यास नकार दिला. त्यावेळी पत्नीची आई म्हणजेच सासू देखील घरीच होती.

दरम्यान जावयाने सासूला उद्देशून बोलत “माझी बायको तुमच्याकडे आहे. तिला माझ्यासोबत आत्ताच पठवा, नाहीतर तुम्हीच माझ्यासोबत चला” असे अपशब्द वापरून सासूचा हात पकडला व तिच्या अंगावरील साडी ओढली. तसेच शालकाचा पाहून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ करून निघून गेला.

याप्रकरणी सासूने मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जावयावर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल पाटील करीत आहे..

 

Leave A Reply

Your email address will not be published.