Thursday, February 2, 2023

सरळता व सहजता असेल तर मोक्ष मार्ग गवसतो

- Advertisement -

प्रवचन सारांश 25/09/2022

झुंबर मुनी यांच्यात सहजता व सरळता होती. संयम व संथारा या दोन्ही गोष्टी साध्य करून आपला मोक्षमार्ग निवडला असे भावपूर्ण उद्गार डॉ. पदमचंद्र मुनी यांनी आजच्या प्रवचनात काढले. झुंबर मुनींच्या चौथ्या दीक्षा दिनाच्या औचित्याने त्यांनी प्रवचन केले.

जळगाव पुण्यभूमी आहे. व्यवहार असो की आध्यात्म असो एक क्षण देखील वादविवाद केला नाही. ते कर्मवीर व धर्मवीर असा राजस्थानचा कांकरिया परिवार आहे त्या परिवारातील ते होते. झुंबर  मुनी यांच्यात कमालीची सरळता, सहजता,  ऋजुता होती. कथनी व करणी यात त्यांनी कधीच फरक केला नाही. त्यांच्यातली सरळता हेच त्यांच्या मोक्षाचा मार्ग मोकळा करणारा ठरला. असे अनुपेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी यांनी रविवारचे विशेष प्रवचन केले.

- Advertisement -

झुंबरलालजी हे सर्वांचे हितचिंतक होते. त्यांनी आपले स्पष्ट बोलणे हा गुण शेवटापर्यंत जागृत ठेवला. त्यांच्या बोलण्याचा कुणालाही राग येत नसे कारण ते हिताचे  सांगत असत. सर्व परंपरा, साधूंना ते मानत असत. 93 वर्षे ते  जगले झुंबरलालजी यांनी मृत्युचा महोत्सव मनवला. संथारा घेऊन त्यांचे पंडीत मरण होते. त्यांची जन्म जयंती, दीक्षा दिवस वगैरे नका साजरा करा परंतु त्यांचा संथारा दिवस नक्की  साजरा करा,  या दिनाच्या औचित्याने नेमका संथारा काय प्रकार असतो ? याबाबत वक्त्यांना सविस्तर बोलायला सांगा असे आवर्जुन सांगितले.

दुर्दैवाने संथारा ह्याला आत्महत्या मानले जाते, त्याबद्दल समाजात मोठा गैरसमज पसरविण्यात आलेला आहे. खरे पाहिले तर आत्महत्या ही नकारात्मक परिस्थितीमध्ये केली जाते. राग, द्वेष इत्यादी चुकीच्या भावनेमध्ये आत्महत्या करण्यात येते परंतु संथारा हे व्रत आत्महत्या नव्हे याबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात यावा याबद्दल त्यांनी आपल्या प्रवचनात आग्रह धरला.

संथाराबद्दलची शास्त्र शुद्ध माहिती झुंबर मुनींच्या संथारा दिनाच्या औचित्याने देण्यात यावी असे कवकळीचे आवाहन केले.  झुंबरलालजी नियमीत प्रतिक्रमण करत असत त्यांच्या आजारपणात ते प्रतिक्रमण विसरले, त्यांच्या मनात प्रतिक्रमण विस्मृती झाल्याचे शल्य त्यांना शेवट पर्यंत बोचत होते. धर्मात आणि सत्कार्यासाठी पुढे असलेल्या झुंबर मुनी यांचे चरित्र खरोखर प्रेरणादायक आहे असे  पदमचंद्र मुनी त्यांच्या विषयी म्हणाले.

———□■□■ ———

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे