सेवा समर्पण सप्ताह निमित्त भव्य रक्तदान शिबिर

0

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाळधी येथे उद्या दि. 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती  2 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्य सरकारतर्फे  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता, सेवा पंधरवाडा म्हणून विविध आरोग्य शिबिर तसेच फळ वाटप, समाधान शिबिर, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे.

त्या अंतर्गत पाळधी येथे स. न. झंवर विद्यालय येथ दिे. 26 सप्टेंबर सोमवारी सकाळी 10:00 वा महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाळधी परिसर व चांदसर, चोरगाव, बांबोरी गट, भाजपा-  शिवसेना यांनी आयोजन केले.  तसेच तालुका उपाध्यक्ष किशोर झंवर, शहराध्यक्ष संदेश झंवर, बापू ठाकरे , महेंद्र चौधरी, प्रकाश ठाकूर आदींनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.