ब्रेकिंग ! पाटबंधारेचा लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पाटबंधारे विभागामधील एका लिपीकला १४ हजार रुपयाची लाच घेताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुषार अशोक पाटील असे लाचखोराचे नाव आहे.

मन्याड धरणातून तालुक्यातील शेतकऱ्यांना  शासनाकडून मोफत गाळ देण्यात येते. परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर १२०० रूपये प्रमाणे ११ जणांकडून १४ हजार ४०० रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या गुप्त माहितीनुसार, सदर पथकाने आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार अशोक पाटील याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून धुळे येथील एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.