एक हिट चित्रपट दिला तर डोक्यात हवा गेली का…? बॉबी देओलला नेटकाऱ्यानी केलं ट्रॉल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

संदीप रेड्डी वांगा यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटाने दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरामध्ये ७०० कोटींपासून अधिकची कमाई केली आहे. एकही डायलॉग नसतानाही आणि अवघ्या काही मिनिटांच्या भूमिकेने बॉबी देओलने चाहत्यांची मन जिंकली आहे.

सध्या बॉबी देओलचा भाव वधारला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या सोशल मीडियावर बॉबी देओलचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओवरून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

 

नुकताच बॉबी देओल दिल्ली विमानतळावर पापाराझींच्या कॅमेरामध्ये कैद झाला. यावेळी बॉबी देओलने ब्लॅक प्रिंटेड शर्ट, ब्लॅक पँट आणि ब्लॅक गॉगल असा त्याचा लूक होता. यावेळी जरा घाईमध्ये असल्याचं दिसत आहे. बॉबी घाईमध्ये असताना, त्याच्याकडे एक फॅन सेल्फी घेण्यासाठी आला होता. बॉबी देओल सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनला देत पुढे निघून जातो. बॉबीचं हे वागणं नेटकऱ्यांना खटकलं आहे. ‘बॉलिवूड शादीज’ या इन्स्टा पेजने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओवरुन अनेकांनी बॉबी देओलला प्रचंड ट्रोल केलं आहे. ‘२५ वर्षांच्या सिनेकारकिर्दित एक हिट चित्रपट दिला तर लगेच डोक्यात हवा गेली का?’, ‘पिक्चरचं सक्सेस याच्या डोक्यात गेलं आहे’, ‘नेमकं बॉबीला लॉर्ड का म्हटलं जातंय’ तर आणखी एकाने ‘अजूनही ‘अबरार’च्याच भूमिकेत आहेस का?, रियल लाईफमध्ये ये’ असं म्हणत नेटकरी बॉबी देओलला ट्रोल करीत आहे.

१३ दिवसात चित्रपटाने वर्ल्डवाईड ७५० कोटींवर कलेक्शन केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत ७७२.३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकट्या भारतात एकूण ४६८ कोटी कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.