चाळीसगावात दोन अल्पवयीनांकडे आढळले २ गावठी कट्ट्यांसह १० जिवंत काडतुसे

0

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

खुनाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष दोघा अल्पवयीन बालकांकडे गावठी कट्ट्यासह १० जिवंत काडतुसे हनुमानवाडी परिसरात गस्त घालत असताना मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

शहर पोलिस ठाण्याचे हवालदार योगेश बेलदार, पोलिस नाईक दीपक पाटील, नीलेश पाटील, विनोद खैरनार, हे २९ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरात गस्त घालत होते. हनुमानवाडी येथे रेल्वे उड्डाण पुलावर तिघे अल्पवयीन पोलिसांना पाहून पळू लागले. त्यापैकी दोघांनी त्यांच्या हातातील वस्तू मंदिराच्या मागील बाजूस भिंतीलगत अंधारात टाकून घरात पळ काढला. हे दोघे खुनाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक असल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी मंदिराच्या मागील बाजूची पाहणी केली असता भिंतीलगत दोन गावठी पिस्तुल, मॅक्झीनसह टाकलेल्या आढळल्या. पोलिसांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांना माहिती दिली. नंतर घटनेचा पंचनामा करून दोन कट्टे, २ मॅक्झीन व १० जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली. पळून गेलेल्या दोघा मुलांना चिळसगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी नाईक दीपक प्रभाकर पाटील यांच्या फिर्यादीनुसार तिघा अल्पवयीन संशयीतांविरोधात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.