ब्रेकिंग; मोदी नावावरून केलेलं वक्तव्य भोवले, राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा

0

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दलची आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत असून राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुणावली आहे. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य ते करत असतात. आणि त्याच मुळे त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आहे. राहुल गांधी यांनी ‘मोदी आडनाव’वरून वादग्रस्त विधान केले होते, याच प्रकरणात सुरत कोर्टाने हा निर्णय दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावर भाष्य करताना मोदी हे सर्व चोरांचे नाव आहे का? असे विधान केले होते. यावरुनच मोदी आडनाव बदनामी प्रकरणी (defamation case) सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाने ३० दिवसांची शिक्षाही स्थगित केली आहे.

काय आहे प्रकरण
13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधींनी “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का?” असे विधान केले होते. याच प्रकरणावरुन राहुल गांधी यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू होता.

Leave A Reply

Your email address will not be published.