मुलबाळ होत नसल्याने,शेतीसाठी ५० हजारांच्या मागणीसाठी विवाहितांचा छळ

0

जळगाव ;- शेती करण्यासाठी माहेरहून ५० हजार आणावेत या मागणीसाठी आणि दुसऱ्या घटनेत मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बहाळ ता. चाळीसगाव येथील माहेर असलेल्या सुरेखा सागर ठाकरे वय २५ यांना लग्न झाल्यापासून मुलबाळ होत नसल्याने पती सागर अशोक ठाकरे ,कळंबे ठाकरे,मांगीलाल ठाकरे,रजनी मांगीलाल ठाकरे सर्व. रा. मेहुणबारे यांनी २१ एप्रिल २०१९ पासून आजपावेतो लग्न झाल्यापासून मुलबाळ न झाल्याने वरील आरोपींची शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची फिर्याद दिल्यावरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ पाटील करीत आहे.

शेती करण्यासाठी ५० हजार आणावेत या मागणीसाठी पीलखेडा येथील सासर असलेल्या मनीषा उदयभान साळुंखे वय २५ यांना १४ फेब्रुवारी २०१७ चे सहा महिन्यानंतर मार्च २०२० पर्यंत माहेरहून शेती करण्यासाठी ५० हजारांची मागणी करणारा पती उदयभान खंडू साळुंखे,सासु बणाबाई साळुंके , नणंद सुनंदा शांताराम करदीकर ,नणंद आशाबाई बाळू सपकाळे, नांदोई बाळू सपकाळे ,नंणद शोभाबाई कैलास सपकाळे , नणंद रंजनाबाई प्रवीण सपकाळे, आदींविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ संदीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.