कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
माहेरहुन कार घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, दहिगांव संत ता. पाचोरा येथील दिपाली हिचा विवाह कुसुंबा ता. जि. जळगाव येथील धनराज नामदेव जाधव यांचेशी दि. २७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणुक दिल्यानंतर किरकोळ कारणावरून दिपाली हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. दिपाली हिचा पती धनराज जाधव व सासरच्या मंडळींने चारचाकी कार घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणावे अशी मागणी सातत्याने करून दिपाली हिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याने याला कंटाळून अखेर दिपाली हिने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये धनराज नामदेव जाधव (पती), नामदेव मोतीराम जाधव (सासरे) व शांताबाई नामदेव जाधव (सासु) सर्व रा. कुसुंबा ता. जि. जळगाव यांचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन तपास पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.