सोशल मीडियात झाली ओळख ;अत्याचारातून महिला गर्भवती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
सोशल मीडियाच्या फेसबुकवरून महिलेशी ओळख झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याने महिला गर्भवती झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून भडगावच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव शहरातील सागर भिमा वैद्य याने गुजरात राज्यातील एका २६ वर्षीय महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण केलयाने या दोघांचे मैत्रीत रूपांतर झाले. यानंतर सागर वैद्य याने महिलेला नाशिक येथे बोलावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.तसेच महिलेसोबत काढलेले फोटो मित्रांना पाठविले. या अत्याचारात महिला गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, महिला गरोदर असल्याचे समजताच संशयित आरोपी सागर भिमा वैद्य हा पळून गेल्याने महिलेने र भडगाव पोलीस ठाणे गाठून सागर विरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून शनिवारी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.