जळगावच्या बसस्टॅण्डवरून पर्समधून महिलेची रोकड लांबविली

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावमधील नवीन बसस्थानक आवारातून महिलेची रोकड अज्ञात व्यक्तीने लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुकयेथील रहिवाशी रोहिणी प्रदीप कुमावत (वय-३०) ह्या जळगाव शहरात आपल्या नातेवाईकांकडे खासगी कामानिमित्त आलेल्या होत्या. २१ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या जळगाव शहरातील नवीन बस स्थानकात आलेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या जवळ असलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ५ हजार रुपयांची रोकड लंबवल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस नाईक संतोष सोनवणे तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.