जळगाव :- येथील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे व इतरांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पूजा मुकेश जांगिड वय 34 राहणार जबलपूर हल्ली मुक्काम गणेश वाडी हिचे लग्न 2021 ला मुकेश राधेश्याम जांगिड राहणार शुक्ला नगर ,गंदा गडा ,जबलपूर यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर घर घेण्यासाठी पती मुकेश जांगिड याने पाच लाख रुपये बाहेरून आणावेत अशी मागणी केली.
तसेच सासू सुमित्रा जांगिड सासरा राधेश्याम जांगिड नणंद निशा लोकेश शर्मा राहणार जबलपूर आणि माम सासरे सुभाष जांगिड दोन्ही राहणार भोपाल यांनी माहेरहून घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने जळगाव माहेरी आल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर पती सासू सासरे ननंद आणि माम सासरे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.